आई
आई....या शब्दामध्ये आपल पूर्ण जग सामावल आहे.आई म्हणजे आपल्यासाठी नेहमी दिवसभर झटत राहणारी व्यक्ती.स्वतःपेक्षा नेहमी फक्त आणि फक्त ती आपलाच विचार करत असते.नेहमी आपल्या सुखाचा विचार करत असते.तिला कितीही दुःख,अडचणी असूदेत,पण आपल्याला आनंदी बघितल की तिच दुःख ती कुठच्या कुठे विसरून जाते.आई म्हणजे मायेचा ओलावा,एक अशी मायेची ऊब ज्यामुळे आपल्याला खूप धीर मिळतो.आपल्याला आयुष्यात पुढे जाऊन सगळे काही मिळावे,आपल्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवते.बालपणी सुद्धा आपण घाबरलेले असलो तर तिच्या कुशीत बसून राहण्यास एक वेगळाच आनंद वाटायचा .हे असे लिहिताना नकळत बालपणीच्या आठवणी डोळ्यासमोरून गेल्या.असे वाटते आपले ते दिवस परत आले तर किती बरे होईल ना. आपण जसे मोठे होत जातो. आपल्या वागण्यात बदल होत असेल पण आई ही तशीच असते.नेहमी आपली काळजी करणारी,आपल्याला जपणारी.आपण शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरीला लागतो आणि थोड्या का होईना पण तिच्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो.आपल्या पगारातून तिच्यासाठी आणलेली वस्तू पाहून ती किती खुश होते.तिच्या चेहऱ्यावरचा आनंद खरंच ...