पोस्ट्स

माझं अंगण....

माझं अंगण हे पहाटे पहाटे पडलेल्या सोनेरी सूर्यकिरणांनी भरून गेलेलं. अंगणात वाढलेल्या प्रत्येक रोपावर हे सोनेरी सूर्यकिरण असं काही पडतं जणू ही सोनेरी किरणं त्या रोपांना कुरवाळत आहेत. शेणाने सारवलेली जमीन, तुळशी वृंदावन, कोंबड्यांचे आरवणे, अधून मधून कोकिळेचा कानावर पडणारा आवाज, तुळशी वृंदावनात लावलेल्या अगरबत्तीचा सुवास आणि सोबत जास्वंदीच्या फुलांनी सजून गेलेलं तुळशी वृंदावन. तुळशी वृंदावनाच्या आजूबाजूची रांगोळीने सजलेली जमीन. अंगणात प्राजक्ताच्या फुलांची झालेली आरास, लहान मुलांचे अंगणात रंगलेले विविध खेळ. पावसात तर अंगण संपूर्ण पावसाच्या सरींनी भिजून जाते. मातीचा सुवास सर्वत्र दरवळतो. अंगणात उभे राहून हातावर पावसाचे थेंब झेलणे, पावसात ओलेचिंब भिजून जाणे, त्या साचलेल्या पाण्यात उड्या मारणे. अंगणातली रोपटी तर पावसामुळे अजून बहरून जातात. अंगणाची शोभा अजूनच वाढते. आजीचे जात्यावर दळण दळणे, ते काम करता करता ओवी बोलणे. आजीला मदत करत करत तिच्या ओवी ऐकणे आणि तिच्या गोष्टी ऐकणे. अंगणात उन्हाळ्यात काही सुकायला ठेवलं असेल तर दुपारी ते हळूच खाणे. रात्रीचे जेवण झाल्यावर अंगणात सर्वजण एकत्र बसून गप्पा...

मेरा भारत देश....

  नमस्कार, मैं हमारे इस भारत देश की एक युवा आज  आपसे कुछ बातचीत करना चाहती हूं. हम सब रोजाना जिंदगी में कुछ ऐसे लोगों को देखते हैं जो कहीं पर भी कचरा फेक देते हैं, गंदगी फैलाते हैं, सार्वजनिक शौचालय का इस्तमाल ना करते हुए कहीं पर भी पेशाब कर देते हैं, जो क्या सच में इस भारत देश के सुजाण नागरिक हो सकते हैं. ऐसे कई लोग हम रोज देखते हैं. पर क्या हम ऐसे लोगों को टोकते हैं. इनको ये हरकते करने से हम रोकते हैं. इन लोगों को अभी नहीं रुकायेंगे तो आनेवाले सालों में ये सृष्टी सच में जीवित रहेगी. आजकल जिस  नैसर्गिक आपत्ती से हम सब गुज़र रहे हैं इस सब के जिम्मेदार आखिर कौन हैं? जो लोग कहीं पर कचरा डाल देते हैं, या वो लोग जो बीच सड़क पर ही थुंकते हैं, या वो लोग जो कहीं घुमने जाते हैं और उसी जगह पर गंदगी फैलाकर आ जाते हैं. भारतीय नागरिक होने के कर्तव्य से अगर हम किसी जगह को साफ नहीं कर सकते तो उस जगह पर गंदगी करने का हक भी हमें नहीं. अगर इस भारत देश को, इस सृष्टी को हमें कोई हानी नहीं पहुंचानी हैं तो उठिए और मन में एक ध्येय बना लिजिए की मैं हूं इस भारत देश का सुजाण नागरिक और इस देश को, ...

हेमाद्रि पंडित.

  ह्या लेखात आपण अजून एक ऐतिहासिक माहिती जाणून घेणार आहोत. हेमाद्रि पंडित ज्यांनी मोडी लिपीचा शोध लावला असे मानले जाते. तर त्यांच्या ह्या कारकिर्दीबद्दल आपण आज माहिती जाणून घेऊया. हेमाद्रि पंडित.                      भारतातील महादेव यादव आणि रामदेव यादव  ह्यांच्या राज्यकाळात इसवी सन १२६० ते १३०९ "हेमाद्रि पंडित"(उपनाव-हेमाडपंत) हे प्रधान होते. त्यांनी "मोडी लिपीचा" वापर सुरु केला असे मानले जाते. "हेमाड पंत" ह्यांनी त्याकाळी अनेक देवळांच्या बांधकामात एक खास अशी शैली वापरली. ह्या पद्धतीच्या मंदिरांना "हेमाडपंती" प्रकारातले मंदिर असे म्हणतात.                       यादवकालीन एक व्युत्पन्नसंस्कृत पंडित, मंत्री आणि धर्मशास्त्रकार, "हेमाडी पंडित" अथवा "हेमाडपंत" ह्या नावानेही त्यांचा कोरीव लेखांत उल्लेख आढळतो. त्यांच्या पूर्व आयुष्याबद्दल फारशी माहिती ज्ञात नाही परंतु, तत्काल...

भूतकाळात गुंतलेलं मन....

 आपल्या मनाला का कोण जाणे परंतु, वास्तविक किंवा भविष्यातील गोष्टींचा विचार करण्यापेक्षा भूतकाळातील घडून गेलेल्या क्षणांत ते नेहमी गुंतून जातं. एखादी वाईट घटना घडली असेल तर ती का घडली, असं नाही व्हायला पाहिजे होतं, ती गोष्ट घडलीच नसती तर किती बरं झालं असतं हाच विचार आपलं मन करत असतं. एखादी व्यक्ती साथ सोडून गेली तर त्याच व्यक्तीच्या आठवणींत आपण जगत राहतो. परंतु, वर्तमानकाळात कोण आपल्या सोबत आहे, त्या व्यक्तीचं स्थान आपल्या आयुष्यात काय आहे, ती व्यक्ती आपल्याला किती प्रिय आहे, त्या व्यक्तीच्या आयुष्यात आपलं काय स्थान आहे ह्या गोष्टींचा विचार आपण खरंच करतो का? आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती आपल्या जगण्यात काही ना काही बदल घेऊन येते. प्रत्येक व्यक्ती ही त्याच्या विचारांनी आपल्याला सुद्धा विचार करायला भाग पाडते. प्रत्येक व्यक्तीची छाप ही वेगळ्या रीतीने आपल्या आयुष्यावर पडते. एखादी व्यक्ती काही काळासाठी सोबत असते तर एखादी व्यक्ती आयुष्यभरासाठी सोबत असते. जी व्यक्ती साथ सोडून गेली तिच्या आठवणींत झुरत राहायचं की जी व्यक्ती सोबत आहे तिच्या सोबतीने आयुष्य सुंदर बनवायचं हे आपल्या हातात असतं...

वीरगळ प्रकार.....

  मागील लेखात आपण "वीरगळ" ह्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेतली आणि वीरगळचे दोन प्रकार ह्याबद्दल सुद्धा माहिती जाणून घेतली. आजच्या लेखामार्फत आपण वीरगळीचे उर्वरित प्रकार, तसेच वीरगळ कोणत्या ठिकाणी आहेत ह्याबद्दल माहिती जाणून घेऊया. * वीरगळीचे हे दोन प्रमुख प्रकार आहेत ज्याबद्दल आपण आधीच्या लेखात माहिती जाणून घेतली. १. आयताकृती वीरगळ      ही वीरगळ फक्त समोरून किंवा तीन बाजूने कोरलेली असते. २. स्तंभ वीरगळ     ही वीरगळ चारही बाजूने कोरलेली असते. * आता आपण वीरगळीचे उर्वरित प्रकार आणि त्याबद्दल संदर्भात माहिती जाणून घेऊया. १. वीरबळी वीरगळ  २. गोवर्धन/गोधन वीरगळ  ३. पशु वीरगळ ४. द्वंद्व वीरगळ  ५. डोली वीरगळ  ६. गाववली वीरगळ  ७. अश्वदल/गजदल वीरगळ  ८. चौर्य वीरगळ  ९. साधू/संत वीरगळ  १०. सूर वीरगळ  ११. ताबूत वीरगळ  * माहिती:- १. वीरबळी वीरगळ      "वीरबळी वीरगळ" म्हणजे वीर राजा युद्धात जिंकावा म्हणून स्वतःच्या हाताने शिरच्छेद करून घेत त्याची शिळा. २. गोवर्धन/गोधन वीरगळ    ...

वीरगळ....वीर पुरुषांच्या स्मरणार्थ.

इमेज
* वीरगळ अर्थ वीरगळ म्हणजे वीर पुरुषांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेला(दगडाचा अथवा लाकडाचा)स्तंभ असतो. ह्यास वीरस्तंभ असेही म्हणतात. महाराष्ट्रात जुन्या देवळांच्या बाहेर वीरगळ आढळतात. * वीरगळ इतिहास वीरगळ परंपरा ही कर्नाटकातून महाराष्ट्रात आली असे मानले जाते. कर्नाटक राज्यात मोठमोठे वीरगळ आढळून येतात, त्यातील काही वीरगळ हे शिलालेखांनी युक्त आहेत. महाराष्ट्रात शिलालेख कोरलेले वीरगळ तुलनेने कमी आहेत. * वीरगळाचे स्वरूप  -वीरगळाचे सामान्यपणे तीन किंवा पाच भाग असतात. -साधारणपणे अडीच किंवा तीन फूट दगडावर एकावर एक ह्या पद्धतीने तीन किंवा चार चौकोन खोदून घेतले जातात. -सर्वांत खालच्या भागात वीर युद्धात लढत आहे, असे दाखवलेले असते. ह्यातून लढाईचे कारण सुद्धा स्पष्ट होते. -सर्वांत वरच्या भागात वीर योद्धा कैलास पर्वताला गेला आहे आणि शंकराच्या पिंडीची पूजा करत आहे, असे दाखवलेले असते. युद्धात मरण आल्यास स्वर्गलोकप्राप्ती होते असे ह्यातून सुचवायचे असावे. -काही वीरगळ हे चंद्र सूर्य ह्यांनी अंकित असतात. आकाशात चंद्र-सूर्य तळपत आहेत तोपर्यंत ह्या वीरांची स्मृती कायम राहिली असे ह्यातून सूचित करावयाच...

मोडी लिपीची गोडी......

इमेज
  * ऐतिहासिक वारसा लाभलेल्या मोडी लिपी बद्दलची माहिती मी आज तुम्हा सर्व वाचकांसाठी घेऊन येते आहे. ९00 वर्षांचा वारसा लाभलेल्या ह्या मोडी लिपीबद्दल आपण माहिती जाऊन घेऊया. १.मोडी लिपी माहिती                                 "मोडी लिपी" ही मराठी भाषा लिहिण्यासाठी वापरली जाणारी लिपी आहे, जी महाराष्ट्र राज्यात बोलली जाणारी प्राथमिक भाषा आहे. मोडी लिपीच्या उत्पत्ती संदर्भात अनेक सिद्धांत आहेत. विसाव्या शतकापर्यंत देवनागरी लिपी बरोबरच देवस्थान लिपीच्या बाळबोध शैलीला मराठी साठी प्रमाणित लेखन प्रणाली म्हणून बढती दिली जाईपर्यंत मोडी लिपीचा वापर मराठी भाषेसाठी केला जात असे. एकविसाव्या शताब्दीचे मराठी भाषिक लोकांचे असे विचार व  मत झाले आहे की, जर मराठी भाषेची मूळ असलेली "मोडी लिपी" जर पुन्हा वापरात आणली गेली तर मराठी भाषेचा प्रभाव वाढेल.                ...