शेतकऱ्याची व्यथा
ती रात्र खूपच भयाण वाटत होती.त्यातच अधून-मधून येणारा रातकिड्यांचा आवाज,झाडांवरील सळसळणाऱ्या पानांचा आवाज त्या रात्रीची भयाणता अजूनच वाढवत होता.रामूला काही केल्या झोपच लागत नव्हती.ह्या कुशीवरून त्या कुशीवर असा त्याचा झोपण्यासाठीचा प्रयत्न चालूच होता.घराच्या छपराकडे बघत त्याच्या मनात विचार चालूच होते.जणू काही विचारांनी त्याच्या मनात कायमचा मुक्कामच केला होता.उद्याच्या दिवसाची चिंता त्याला भेडसावत होती ती म्हणजे आपले पिक ज्यासाठी इतकी मेहनत घेतली ते व्यवस्थित होईल की नाही?आणि व्यवस्थित झाले तर भाव हवा तसा मिळेल की नाही?निदान उद्या तरी कर्जमाफी बद्दल काहीतरी बातमी कळेल की नाही?पिकातून हवा तसा मोबदला मिळाला तर बायको आणि मुलांसाठी काहीतरी करण्याची त्याची इच्छा होती ती पूर्ण होईल का?दोन्ही मुलांचा शिक्षणाचा खर्च भागेल ना?अशा कित्येक प्रश्नांनी त्याच्या मनात थैमान घातल होत.अखेर कित्येक वेळाने आणि अथक प्रयत्नांनंतर रामूचा आणि झोपेचा मेळ साधला गेला आणि तो झोपी गेला.दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला जाग आली ती कोण तरी घराच्या दारावर येऊन काहीतरी सांगत आहे आणि त्यातील काही शब्द त्याच्या कानावर पडले.ते ...