आजच्या काळाची गरज -गडसरंक्षण
आज खूप महत्वाच्या विषयाला हात घालणार आहे.आपलं जे अफाट मराठी साम्राज्य आहे ते उभे करायला आपल्याला खूप शूर व्यक्ती लाभल्या.त्यामधीलच व्यक्ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.आजही त्यांचे नाव ऐकले की,डोळ्यांसमोर एक शूर,बेधडक अशी प्रतिकृती तयार होते.लहान असताना शालेय जीवनात इतिहासात खूप शिवाजी महाराजांबद्दल वाचल होत,त्यांचे ते कार्य,मराठी साम्राज्यासाठी केलीली अफाट मेहनत,शिवाजीराजांचे मावळे,गड जिंकण्यासाठीचे अथक प्रयत्न,सगळं काही ऐकलं होत.परंतु पुढे जाऊन हे फक्त अभ्यासापुरतं मर्यादित राहील अस वाटलं होत.कधी प्रत्यक्ष जीवनात गड-किल्ल्यांचा अनुभव घ्यायला मिळेल वाटलं नव्हत.ट्रेकिंग,गडभ्रमंती विषयी खूप ऐकलं होत खरं तर.आणि आपण जेव्हा एखाद्या गोष्टी विषयी ऐकतो तर आपल्याला लगेच उत्सुकता निर्माण होतेच.तेव्हा ठरवलं आपण ही तो अनुभव घ्यायचा.आणि तो दिवस उजाडलाच जेव्हा गडभ्रमंती करण्याची संधी मिळाली.आपण जर पहिल्यांदा एखाद्या गोष्टीचा अनुभव घेणार असू तर आपण थोडे का होईना उत्सुक असतोच.तशीच मी ही उत्सुक होते.आतापर्यंत मी तीन गडभ्रमंती केल्या आहेत.तिन्ही गडभ्रमंतीचा अनुभव इतका अफाट आणि अविस्मरणीय...