नवरात्र..स्त्रीशक्ती दिवस
नवरात्र..स्त्रीशक्ती दिवस....... हे नऊ दिवस म्हणजे स्त्रीकडे सर्वजण आदराने,अभिमानाने बघतात.एक प्रकारे दुर्गामातेचं आगमन होत.हे नऊ दिवस स्त्रिया रोजच्या कामाच्या व्यापातून थोडावेळ आपल्यासाठी काढतात.थोडावेळ का होईना पण आनंदाने छान नटून थटून,हास्यमुखाने,आनंदाने ते नऊ दिवस साजरे करतात.प्रत्येक स्त्रीकडे,मुलीकडे एक वेगळीच शक्ती आहे.दुर्गामातेचा आशीर्वादच जणू नेहमी प्रत्येक स्त्रीच्या पाठीशी आहे असे वाटते. दुर्गामातेकडे जी शक्ती आहे तीच शक्ती दुर्गामातेने प्रत्येक स्त्रीला दिली आहे.आजकाल स्त्रिया प्रत्येक जबाबदारी सांभाळून वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात आपल नाव मोठं करतायत.खरंच खूप अभिमान वाटतो स्त्रियांचा.घरची जबाबदारी तर चोखपणे पार पाडतातच पण अगदी तसेच बाहेरील जबाबदारी ही त्या चोखपणे पार पाडतात.प्रत्येक वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात आपला ठसा उमटवतात.पण आजही विविध बातम्या ऐकून,वर्तमानपत्र वाचून मनात एक विचार सारखा घर करून जातो,तो म्हणजे खरंच आजकाल स्त्री सुरक्षित आहे का?,ती स्वतःचे निर्णय ठामपणे घेऊ शकते का?तिच्यावर हुंडा न दिल्यामुळे होणारे अत्याचार थांबतील का?असे किती तरी प्रश्न उभे राहतात.अगदी तरुण मुली,लहान मुलींवर सुद्धा अत्याचार होतात.ही लोक असा विचार का नाही करत की,आपली ही मुलगी आहे,बहीण आहे,आई आहे,बायको आहे,तिला जसा मान आपण देतो,तसाच प्रत्येक स्त्रीला दिला तर हे जे सगळे अत्याचार आहेत सर्वच थांबतील.नवरात्रीच्या नऊ दिवसात जो आदर,मान स्त्रियांना देतो,त्यांचा विचार करतो तसेच जर रोज त्यांना वागणूक दिली तर.हा विचार प्रत्येकाने नक्कीच करण्याची गरज आहे.स्त्रीवर कोणत्याही प्रकारचे अत्याचार होत असतील तर तिने ते सहन न करता त्याविरुद्ध आवाज उठविण्याची गरज आहे. दुर्गामातेप्रमाणे तिने ह्या प्रत्येकाचा
सामना केला पाहिजे.तरच ही अतिशय वाईट प्रवृत्ती समाजातून पूर्णतः नष्ट होईल. शेवटी फक्त प्रत्येक स्त्रीशक्तीला माझा मनापासून सलाम.🙏🙏🙏🙏🙏🙏
Khupach Chan👌👌
उत्तर द्याहटवा🙏🙏
हटवा👌🤘
उत्तर द्याहटवा