पोस्ट्स

सप्टेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पाना खोना लगा रहेगा....

  पाना खोना लगा रहेगा. जिंदगी में हर एक शख्स आएगा और जाएगा. जिंदगी में हमारे लिए कोई नहीं रुकेगा. बस उस शख्स का जिंदगी से चले जाना दिल को बहुत तकलीफ देगा. पर ये दिल ही तो है एक ना एक दिन संवर ही जाएगा. हर कोई अपने जिंदगी का सफर अकेले ही तय करेगा.

माझ्या कविता.

तू माझ्या समोर येताच मी पाहत राहिले तुलाच भान हरपून. तुझे हे सौंदर्य पाहताच काय बोलायचे हे सुद्धा गेले मी विसरून. ही नजर फक्त आणि फक्त तुझ्यावरच गेलीय स्थिरावून... वाटा......... ह्या खडतर आयुष्याच्या प्रवासात एका वाटेवर मी आहे उभी राहूनी. तू कधीतरी येशील अशी आस लावूनी मनी. मी वाट पाहतेय फक्त तुझीच डोळ्यांत आसवे घेऊनी. तू येणार नाही हे माहीत असूनी. उगाच खोटी आशा बाळगतेय मी माझ्या मनी. पाऊस.... पाऊस आला पाऊस आला सोबत रम्य आठवणी घेउनी. त्या पावसात आणि त्या आठवणीत मी गेली भिजुनी. इंद्रधनू चे सप्तरंग आकाशात गेले उधळूनी. असा पाऊस आनंद आणि समाधान देऊन गेला माझ्या मनी.

आयुष्य जगण्याची गंमत......

 आयुष्य जगण्याची गंमत...... आपण रोज आपलं आयुष्य जगत असतो. दिवस सुरु होतो तो धावपळीत, चिंता, अपेक्षा, जबाबदाऱ्या ह्या सर्वांपासून.हे सर्व काही सांभाळता सांभाळता आपण किती व्यस्त होऊन जातो ना. खरा जगण्याचा अर्थ काय? जगण्याची खरी गंमत कशात आहे? हेच आपण या सर्व जबाबदारीमुळे विसरून जातो. स्वतःच अस्तित्व कुठेतरी हरवून जातं. पण एकदा तरी स्वतःसाठी जगावं प्रत्येकाने. एक दिवस तो असा जगावा की, जसा काय तो दिवस फक्त आपलाच आहे. स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घ्या, दुःख चिंता सर्व काही रोज वाट्याला येतातच. पण त्यादिवशी सर्व काही विसरून तो एक दिवस स्वतःसाठी जगा. तुम्हाला आवडत असेल ती गोष्ट करा. समुद्रकिनारी डोळे मिटून निवांत बसा. त्या समुद्राच्या ठिकाणी येणारा लाटांचा आवाज, तिथे वाहणाऱ्या वाऱ्याचा आवाज, पक्ष्यांचा आवाज, तिथे बागडणाऱ्या लहान मुलांचा आवाज, तिथल्या वाऱ्याने केलेला स्पर्श अगदी हे सर्व काही मनात साठवून ठेवा. समुद्रकिनाऱ्यावर उधळलेले निसर्गाचे रंग अगदी सर्व काही तुमच्या मनात साठवून ठेवा. तिथल्या लहान मुलांना बागडताना पाहून तुमचं मन सुद्धा बालपणींच्या आठवणींमध्ये रमवा. अगदी लह...

लॉकडाऊनचे दिवस......

 लॉकडाऊनचे दिवस...... लॉकडाऊन...... हा आता रोज कानावर पडणारा शब्द. बघावं तिकडे ह्याचीच चर्चा आहे. बातम्या, सोशल साईट्स वर सगळीकडेच. पण हे दिवस कधी एकदा संपतायत आणि कधी एकदा आधीसारख जीवन जगायला मिळतंय असं प्रत्येकाला वाटतय.          सध्या सर्वजण कोरोना सारख्या महामारीशी लढत आहेत. प्रत्येकजण खूप कठीण काळात दिवस जगत आहेत. ह्या दिवसांत आपल्या मनात कितीतरी प्रश्न निर्माण झाले. हे संकट कधी जाईल? आधीसारखे आयुष्य कधी जगता येईल? मनमोकळेपणाने कधी बाहेर फिरता येईल? कधी एकदा बाहेर मित्रांना भेटता येईल? बाहेर पडून कधी चमचमीत पदार्थ खाता येतील? मित्रांसोबत कधी मजा मस्ती करता येईल? असे अनेक प्रश्न सर्वांना आहेत.          परंतु, असं हे जगणं खरंच वाईट आहे का? ह्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला तर हे आयुष्य सुद्धा खूप छान वाटेल. कधी तुम्हाला ह्या लॉकडाऊनच्या दिवसांबद्दल तक्रार करावीशी वाटलीच. तर त्यांचे चेहरे समोर आणा जे आपल्या कुटुंबापासून दूर अडकले आहेत. ज्यांचे रोजच्या मिळणाऱ्या मजुरीवर जीवन होते. अस...

पत्र आईसाठी....

 आई,तू एक अशी व्यक्ती ह्या पृथ्वीतलावर आहेस जी नेहमी सर्वांचे मन राखत असते. स्वतःपेक्षा तू नेहमी दुसऱ्यांसाठी झटत असतेस. तुला नाही का वाटत आई, स्वतःसाठी वेळ काढावा. सर्वांच्या आवडी निवडी जपता जपता तू स्वतःची आवड काय हेच विसरून जातेस. किती व्यस्त होऊन जातं ना तुझ आयुष्य. मान्य आहे की, तुझा आनंद हा आमच्या आनंदात आहे. पण आई, स्वतःसाठी सुद्धा कधीतरी जगावं ग.  तुझा दिवस सुरू होतो तो आम्हाला नाश्ता साठी काय हवं? दुपारच्या जेवणासाठी काय हवं?रात्रीच्या जेवणासाठी काय हवं? कधी तू स्वतःला विचारतेस का की तुला काय हवय? तुझ शरीर जरी थकल तरी तुझी माया ही तितकीच सर्वांसाठी असते. तुझ्या कुशीत निजणं ह्या गोष्टीचा आनंद काही वेगळाच असतो. तू भरवलेला मायेचा घास सुद्धा माझी भूक भागवतो. पण हेच हात जेव्हा तुला घास भरवण्याची वेळ येते तेव्हा व्यस्त होतात त्याक्षणी मात्र खूप दुःख होत. तू मनात जागा देतेस तुझ्या लेकरांना, त्यांना जिवापाड जपतेस. पण हीच लेकरं मोठी झाल्यावर तुझी अडचण होऊ नये म्हणून जेव्हा वृद्धाश्रमात तुला सोडून जातात तेव्हा मात्र जीव तुटतो. तू केलेली इतक्या वर्षांची माया एका क्षणांत ते कसे क...

आईची माया....

 आईची माया.... आईची माया कधीच कोणासाठी संपत नसते. आपल्या आवडीनिवडी जपत तिच्या दिवसाची सुरुवात होते. दिवसभर मेहनत करत राहणारी ती कधीच थकत नसते. घरी पाहुणे येताच त्यांचे आदरातिथ्य करण्यात ती स्वतःला गुंतवून घेते. ह्या सर्व जबाबदारीत ती स्वतःला मात्र विसरते. तिने केलेल्या स्वयंपाकाने प्रत्येकाचे तृप्त, आनंदी, समाधानी चेहरे पाहून ती स्वतःचा थकवा विसरते. त्या जेवणात तिची माया उतरलेली असते. परंतु, जेव्हा शरीर थकते तेव्हा तिला तिचेच घर परके वाटू लागते. तिने ज्या घराला जिव्हाळा लावला, इतकी वर्ष ज्या घरात आनंदाने संसार केला, त्याच घरातून तिची सोय एका वृद्धाश्रमात केली जाते. त्याक्षणी मात्र ती पूर्णतः खचून जाते आणि डोळ्यात आलेले अश्रू लपवण्याचा प्रयत्न करते.