माझ्या कविता.

तू माझ्या समोर येताच मी पाहत राहिले तुलाच भान हरपून.

तुझे हे सौंदर्य पाहताच काय बोलायचे हे सुद्धा गेले मी विसरून.

ही नजर फक्त आणि फक्त तुझ्यावरच गेलीय स्थिरावून...

वाटा.........

ह्या खडतर आयुष्याच्या प्रवासात एका वाटेवर मी आहे उभी राहूनी.

तू कधीतरी येशील अशी आस लावूनी मनी.

मी वाट पाहतेय फक्त तुझीच डोळ्यांत आसवे घेऊनी.

तू येणार नाही हे माहीत असूनी.

उगाच खोटी आशा बाळगतेय मी माझ्या मनी.



पाऊस....

पाऊस आला पाऊस आला सोबत रम्य आठवणी घेउनी.

त्या पावसात आणि त्या आठवणीत मी गेली भिजुनी.

इंद्रधनू चे सप्तरंग आकाशात गेले उधळूनी.

असा पाऊस आनंद आणि समाधान देऊन गेला माझ्या मनी.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझं अंगण....

मोडी लिपीची गोडी......

सुधागड किल्ला ... अविस्मरणीय आणि निसर्गरमणीय असा प्रवास