पोस्ट्स

नोव्हेंबर, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आजच्या काळाची गरज -गडसरंक्षण

आज खूप महत्वाच्या विषयाला हात घालणार आहे.आपलं जे अफाट मराठी साम्राज्य आहे ते उभे करायला आपल्याला खूप शूर व्यक्ती लाभल्या.त्यामधीलच व्यक्ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.आजही त्यांचे नाव ऐकले की,डोळ्यांसमोर एक शूर,बेधडक अशी प्रतिकृती तयार होते.लहान असताना शालेय जीवनात इतिहासात खूप शिवाजी महाराजांबद्दल वाचल होत,त्यांचे ते कार्य,मराठी साम्राज्यासाठी केलीली अफाट मेहनत,शिवाजीराजांचे मावळे,गड जिंकण्यासाठीचे अथक प्रयत्न,सगळं काही ऐकलं होत.परंतु पुढे जाऊन हे फक्त अभ्यासापुरतं मर्यादित राहील अस वाटलं होत.कधी प्रत्यक्ष जीवनात गड-किल्ल्यांचा अनुभव घ्यायला मिळेल वाटलं नव्हत.ट्रेकिंग,गडभ्रमंती विषयी खूप ऐकलं होत खरं तर.आणि आपण जेव्हा एखाद्या गोष्टी विषयी ऐकतो तर आपल्याला लगेच उत्सुकता निर्माण होतेच.तेव्हा ठरवलं आपण ही तो अनुभव घ्यायचा.आणि तो दिवस  उजाडलाच जेव्हा गडभ्रमंती करण्याची संधी मिळाली.आपण जर पहिल्यांदा एखाद्या गोष्टीचा अनुभव घेणार असू तर आपण  थोडे का होईना उत्सुक असतोच.तशीच मी ही उत्सुक होते.आतापर्यंत मी तीन गडभ्रमंती केल्या आहेत.तिन्ही गडभ्रमंतीचा अनुभव इतका अफाट आणि अविस्मरणीय...

दिवाळी.....आनंदाचा आणि जिव्हाळ्याचा सण

दिवाळीचा सण........ह्या सणाबद्दल दरवर्षीच खूप उत्सुकता असते.जसे गणपतीच्या सणाला सगळे उत्सुक असतात अगदी तसेच प्रत्येकजण ह्या सणाला सुद्धा उत्सुक असतात.गणपती बाप्पा जसे आनंद घेऊन घरात येतात,सर्वांना एकत्र आणतात अगदी तसच हा सण सुद्धा प्रत्येकाच्या घरात आनंद आणतो,भरभराट आणतो.दिवाळीशी माझ्या  खूप काही आठवणी जोडलेल्या आहेत त्याच सर्व मी ह्यामध्ये लिहिणार आहे.तुम्ही सर्वजण सुद्धा नक्की त्या आठवणींमध्ये स्वतःला कुठेतरी शोधण्याचा प्रयत्न कराल.माझ्या मते, सर्वात जास्त दिवाळीची उत्सुकता असते ती म्हणजे बालपणीच.बालपणी जो दिवाळीचा मनमुराद आनंद लुटता येतो तो कुठेच मिळू शकत नाही.माझं बालपण गेलं ते म्हणजे पोलीस वसाहतीत.आमच्या इमारतीत एका माळ्यावर बारा खोल्या होत्या.त्याठिकाणी फराळ करण्यात तर एक वेगळीच मजा असायची.मोठी माणस फराळ करायची आणि आम्ही फक्त बसून त्या क्षणांची मजा घ्यायचो.खरंच त्या दिवसांची मजाच काही वेगळी होती.आता लिहिताना सुद्धा ते दिवस डोळ्यासमोरून गेले.दिवाळी म्हणजे फराळ तर असतोच पण अजून काही गोष्टी म्हणजे दिवाळीची खरेदी,फटाके,रांगोळी,कंदील,पणत्या.बालपणी ते आई-वडिलांचा हात धरून खरेदीला...