आजच्या काळाची गरज -गडसरंक्षण
आज खूप महत्वाच्या विषयाला हात घालणार आहे.आपलं जे अफाट मराठी साम्राज्य आहे ते उभे करायला आपल्याला खूप शूर व्यक्ती लाभल्या.त्यामधीलच व्यक्ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.आजही त्यांचे नाव ऐकले की,डोळ्यांसमोर एक शूर,बेधडक अशी प्रतिकृती तयार होते.लहान असताना शालेय जीवनात इतिहासात खूप शिवाजी महाराजांबद्दल वाचल होत,त्यांचे ते कार्य,मराठी साम्राज्यासाठी केलीली अफाट मेहनत,शिवाजीराजांचे मावळे,गड जिंकण्यासाठीचे अथक प्रयत्न,सगळं काही ऐकलं होत.परंतु पुढे जाऊन हे फक्त अभ्यासापुरतं मर्यादित राहील अस वाटलं होत.कधी प्रत्यक्ष जीवनात गड-किल्ल्यांचा अनुभव घ्यायला मिळेल वाटलं नव्हत.ट्रेकिंग,गडभ्रमंती विषयी खूप ऐकलं होत खरं तर.आणि आपण जेव्हा एखाद्या गोष्टी विषयी ऐकतो तर आपल्याला लगेच उत्सुकता निर्माण होतेच.तेव्हा ठरवलं आपण ही तो अनुभव घ्यायचा.आणि तो दिवस उजाडलाच जेव्हा गडभ्रमंती करण्याची संधी मिळाली.आपण जर पहिल्यांदा एखाद्या गोष्टीचा अनुभव घेणार असू तर आपण थोडे का होईना उत्सुक असतोच.तशीच मी ही उत्सुक होते.आतापर्यंत मी तीन गडभ्रमंती केल्या आहेत.तिन्ही गडभ्रमंतीचा अनुभव इतका अफाट आणि अविस्मरणीय होता की,तो असा शब्दात नाही सांगू शकत.पहिली गडभ्रमंती म्हणजे रायगड,दुसरी सुधागड आणि तिसरी म्हणजे राजगड.तिन्ही गडभ्रमंतीचा अनुभव उत्तम होताच त्यात प्रश्नच नाही.परंतु तिन्ही गडभ्रमंतीच्या वेळी अगदी निदर्शनास आलेली गोष्ट म्हणजे गडांवरील कचरा.ते बघून खूपच वाईट वाटले.तरी तेथील काही कचरा आम्ही स्वच्छता मोहिमेदरम्यान साफ केला.पण तरीसुद्धा ही बाब अजूनही लक्षात येत नाही की,जे लोक तिथे येतात ते नक्की कचरा का करतात.शिवाजी महाराजांनी इतकी थोर कामगिरी केली आहे गडांसाठी निदान ह्या गोष्टीचे भान तरी लोकांनी ठेवले पाहिजे. जर तुम्ही एखादे ठिकाण साफ करू शकत नाही तर तुम्हाला कचरा करण्याचा सुद्धा हक्क नाही. माउली आपल्या बाळाला जसे प्रेम करते,सतत त्याचाच विचार करते,अगदी तसेच प्रेम शिवाजी महाराजांचे गडाबद्दल होते.आणि अजून एक गोष्ट सांगायची झाली तर गडांचा होणारा ऱ्हास.मी ज्या तीन ठिकाणी गडभ्रमंतीसाठी गेले तिथे हाच अनुभव आला की,गडांचे फक्त अवशेष बाकी आहेत.असे वाटते की ,तिथले प्रत्येक अवशेष हाक देऊन सांगण्याचा प्रयत्न करतायत की,आम्हाला वाचवा,आमचा विचार करा,ज्या शूर शिवाजी महाराजांनी आम्हाला जपले,त्यांच्याप्रमाणे आम्हाला सुद्धा ताठ मानेने वर्षानुवर्षे उभं राहायचं आहे. जेणेकरून आम्ही पुढच्या पिढ्यांचं स्वागत करण्यासाठी तत्पर राहू. त्याठिकाणी लावलेल्या फलकांमुळे कळते की,ही कोणती जागा आहे.गडसंवर्धन करण्याची खूप गरज आहे.नाहीतर आजकालची जी नवीन पिढी आहे त्यांना कळणारच नाही की,गड काय आहे हे.तरीसुद्धा काही बातम्या ऐकल्या की खूप बर वाटतं की, गडप्रेमींनी गडसंवर्धनाचे केलेले कार्य.दिवाळीच्या निमित्ताने गडप्रेमींनी गडांवर केलेले दीप प्रज्वलन ह्या बातम्या सुद्धा ऐकल्या.परंतु,गड जसे त्यावेळी उजळून निघाले होते,अगदी तसेच जर कायमचे राहावे असे वाटत असेल तर त्यासाठी गडसंवर्धन करणे आजकालची गरज आहे असे म्हणावे लागेल.शिवाजी महाराजांच्या मावळ्यांप्रमाणे सर्वांनी एकत्र येऊन ह्या गोष्टीचा विचार करण्याची नितांत गरज आहे.शिवाजी महाराज ज्या ठिकाणी कुठे असतील ते हे गडसंवर्धनाचे कार्य बघून नक्कीच आनंदीत होतील.
शूर,धाडसी असे छत्रपती शिवाजी महाराज लाभले आम्हास,
लाखमोलाची व्यक्ती,आणि त्यांचे अफाट कार्य लाभले मराठी साम्राज्यास,
मावळ्यांप्रमाणे आम्ही सर्वजण एकत्र येऊ गडसंवर्धनाच्या कार्यास,
छत्रपती शिवाजी महाराज हाच आहे आमच्या प्रत्येकाच्या मनी ध्यास.
Khup chan kirti asach mast blog lihit ka
उत्तर द्याहटवा