आयुष्य जगण्याची गंमत...... आपण रोज आपलं आयुष्य जगत असतो. दिवस सुरु होतो तो धावपळीत, चिंता, अपेक्षा, जबाबदाऱ्या ह्या सर्वांपासून.हे सर्व काही सांभाळता सांभाळता आपण किती व्यस्त होऊन जातो ना. खरा जगण्याचा अर्थ काय? जगण्याची खरी गंमत कशात आहे? हेच आपण या सर्व जबाबदारीमुळे विसरून जातो. स्वतःच अस्तित्व कुठेतरी हरवून जातं. पण एकदा तरी स्वतःसाठी जगावं प्रत्येकाने. एक दिवस तो असा जगावा की, जसा काय तो दिवस फक्त आपलाच आहे. स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घ्या, दुःख चिंता सर्व काही रोज वाट्याला येतातच. पण त्यादिवशी सर्व काही विसरून तो एक दिवस स्वतःसाठी जगा. तुम्हाला आवडत असेल ती गोष्ट करा. समुद्रकिनारी डोळे मिटून निवांत बसा. त्या समुद्राच्या ठिकाणी येणारा लाटांचा आवाज, तिथे वाहणाऱ्या वाऱ्याचा आवाज, पक्ष्यांचा आवाज, तिथे बागडणाऱ्या लहान मुलांचा आवाज, तिथल्या वाऱ्याने केलेला स्पर्श अगदी हे सर्व काही मनात साठवून ठेवा. समुद्रकिनाऱ्यावर उधळलेले निसर्गाचे रंग अगदी सर्व काही तुमच्या मनात साठवून ठेवा. तिथल्या लहान मुलांना बागडताना पाहून तुमचं मन सुद्धा बालपणींच्या आठवणींमध्ये रमवा. अगदी लह...