किल्ला राजगड......खूप अविस्मरणीय गडभ्रमंती
किल्ला राजगड.......ही माझी आतापर्यंतची तिसरी गडभ्रमंती.आधीच्या दोन्ही गडभ्रमंतीप्रमाणे ही गडभ्रमंती सुद्धा तितकीच खूप रोमांचक,खूप मनाला आनंद देणारी होती.पण हा गड फिरून हे मला नक्कीच कळलं की,हे जे सर्व गड आहेत ते म्हणजे आपल्या सर्वांना लाभलेली एक सुंदर अशी भेटवस्तू आहे.मी जो राजगड वर अनुभव घेतला तोच मी माझ्या शब्दात मांडण्याचा छोटासा प्रयत्न करतेय.राजगड ला जाण्यासाठी आम्ही नेहमीप्रमाणे ठरलेल्या ठिकाणी एकत्र जमलो.त्यानंतर सगळे सामान एकत्र ठेऊन आमचा राजगडच्या दिशेने प्रवास सुरु झाला.प्रवास जसा सुरु झाला तसा मनातून खूप आनंद होत होता की कधी एकदा त्या ठिकाणी पोहोचतेय.खरं तर का कोण जाणे पण राजगडच्या बाबतीत मी खूपच उत्सुक होते.खरं तर प्रवास जेव्हा सुरु झाला तेव्हाच मी राजगडपाशी पोहोचले होते फक्त शरीराने पोहोचण्याची बाकी होते.प्रवासात नेहमीप्रमाणे सगळ्यांची मजा-मस्ती चालू होती,गप्पा-गोष्टी चालू होत्या,गाणी चालू होती.थोड्यावेळाने मग गाडीमध्ये संपूर्ण शांतता पसरली कारण सगळेच झोपी गेले.जशी मी उत्सुक होते ह्या गडभ्रमंतीसाठी अगदी तसेच प्रत्येकजण उत्सुक होते.शेवटी ती उत्सुकता संपली आणि आम्ही पहाटे ...