पोस्ट्स

जानेवारी, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

प्रबळगड-रात्रीची अविस्मरणीय गडभ्रमंती

माझी ही आतापर्यंतची चौथी गडभ्रमंती.मी जशी प्रत्येक गडभ्रमंतीसाठी उत्सुक असते अगदी तशीच ह्या गडभ्रमंतीसाठी सुद्धा खूप उत्सुक होते कारण ही गडभ्रमंती थोडी वेगळी होती.थोडी वेगळी ह्या कारणासाठी की ही माझी पहिलीच रात्रीची गडभ्रमंती होती.आयुष्यात प्रथमच रात्रीच्या गडभ्रमंतीचा अनुभव घेणार होते.अखेर ती उत्सुकता संपली आणि तो दिवस आला आणि आमचा प्रवास सुरु झाला प्रबळगडच्या दिशेने.ह्या वेळचा प्रवास आमचा लोकलने होता.दादर-कुर्ला-पनवेल असा आमचा लोकलचा जवळपास दीड तासाचा प्रवास होता.जस जसे पनवेल स्थानक जवळ येत होते तशी थंडी जाणवायला लागली होती.अखेर पनवेल स्थानकावर उतरलो. काहीजण आधीच त्याठिकाणी पोहोचले होते.नंतर मग काहीजण यायचे बाकी होते म्हणून मग आम्ही त्याच ठिकाणी वाट बघत थांबलो.थोड्यावेळाने आम्ही सर्वजण एकत्र जमलो आणि मग प्रत्येकजण आले आहेत की नाही ह्या गोष्टीची तपासणी करून मग आम्ही पुढच्या प्रवासासाठी रवाना झालो.आमचा पुढील प्रवास हा तेथील लोकल वाहतुकीने सुरु झाला.त्या अर्ध्या तासाच्या प्रवासात सुद्धा अधून मधून थंडी तिची जाणीव करून देत होती.अखेर अर्ध्या तासाच्या प्रवासानंतर आम्ही गडाच्या पायथ्याशी ठ...

आयुष्याचा हा प्रवास

आयुष्य म्हणजे नक्की काय असत...... ? सुख-दुःखांचा लपाछपीचा खेळ, आपल्या व्यक्तींसोबत घालवलेल्या गोड,अविस्मरणीय आठवणींचा खजिना, एक असा प्रवास जो कधीही न संपणारा, आयुष्य ह्या एका ठिकाणाच तिकीट फक्त आपल्याला मिळालेल असत, त्या ठिकाणासाठीचा प्रवास कधी सुखांनी,किंवा दुःखांनी, तर कधी आठवणींनी भरलेला असतो,ह्या प्रवासात अशा बऱ्याच नावाची ठिकाण लागतात जी आपल्याला हा प्रवास सुखाचा करण्यास किंवा आनंदी करण्यास सदैव तत्पर असतात ती म्हणजे आपुलकी,प्रेम,जिव्हाळ्याची नाती,माया,माणुसकी  अशी बरीच ठिकाण असतात.ही अशी ठिकाण ह्या प्रवासात असतातच.आपली साथ ती कधीच सोडत नाहीत. शेवटी हा प्रवास कसा होणार,कधी संपणार हे आपल्यावरच अवलंबून असतं, फक्त एवढच आहे की,ह्या प्रवासात न थकता चालत राहायचं असतं ,तेव्हा कुठे हा प्रवास पूर्ण होतो. आयुष्यावर काही दोन ओळी ........                                                            आयुष्य ...