बालपण पुन्हा यावे असे वाटते......
आजकाल सर्वच लहान मुलांना शाळांना सुट्ट्या असल्याकारणाने ठिकठिकाणी त्यांचे आवाज कानावर पडत असतील.ती सर्वच लहान मुलं अगदी खेळण्यात मग्न झाली आहेत.सुट्टीचा अगदी भरपूर आनंद घेत आहेत.त्यादिवशी अशीच खिडकीत उभी असताना अचानक त्या मुलांवर नजर गेली.त्यांना पाहून मी अचानक लहानपणीच्या आठवणींत हरवून गेले.हे तर आपल्या सर्वांच्या बाबतीत नक्कीच होत असणार.कारण तोच एक आयुष्याचा असा टप्पा असतो जो प्रत्येकाला परत आपल्या आयुष्यात यावा असच वाटत असतं.तर हीच भावना मी काही ओळींमधून मांडण्याचा प्रयत्न करतेय. पुन्हा एकदा गल्लीत ते लपाछुपी,लगोरी,पकडा-पकडी चे खेळ रंगावे असे वाटते बालपण पुन्हा यावे असे वाटते.... आजकालच्या मोठमोठ्या पार्ट्यांपेक्षा आधीच्या त्या एक रुपयाच्या पेप्सीची सवंगडी सोबतची पा...