जीवन कदम व्लॉग,मराठी कन्या,मराठी किडा..........#मराठीजीवकन्या#








जीवन कदम व्लॉग या नावाने तुम्ही प्रसिद्ध झालात संपूर्ण महाराष्ट्रात
गड किल्ल्यांचा,पराक्रमी,अनुभवी,माहितीपूर्ण ध्वज लवकरच फडकेल जगभरात,
संपूर्ण तुमचे हे जेकेव्ही कुटुंब नेहमी सोबत राहिल तुमच्या ह्या  प्रवासात,
लवकरच लाखोंचा आकडा हा पोहोचेल कोटींच्या घरात,
जशी फुलं त्यांच्या सुगंधाने प्रत्येकाला आनंद देतात,
त्यांच्या मोहक अशा सुगंधाने प्रत्येकाच्या आयुष्यात एक उमेद आणतात,
अगदी तसंच तुमच्या ह्या ऐतिहासिक माहितीचा,शूर,धाडसी,मेहनती व्यक्तिमत्वाचा सुगंध दरवळतोय आम्हा सर्वांच्या मनात.
गडभ्रमंती करताना अनेक कठीण वाटा मजल-दरमजल करत केलात तुम्ही पार,डोंगररांगामधून वाटा काढत काढत चालू राहिला हा तुमचा प्रवास,तशाच आयुष्यातल्या पुढील वाटा सुद्धा मार्गक्रमण करतील कोटींच्या दिशेने.
यशस्वी असा विडा उचललाय तुम्ही हा उत्तम मार्गदर्शनाचा,तुम्हाला असेच यश लाभो तुमच्या ह्या प्रवासात हीच बाप्पाच्या,महाराजांच्या चरणी प्रार्थना.
 
    जीवनकदमव्लॉगस गुडूप मराठीपाऊलपढतेपुढे एकलाखमराठा शुरवीर इऊ भटकंती   
                                                                 🙏साष्टांग नमस्कार🙏
                     







           मराठी कन्या ह्या मराठमोळ्या वाहिनीला प्रथम माझा मानाचा मुजरा 
खूप विनोदी,तर काही सामाजिक विषय घेऊन तर काही मनोरंजन करणाऱ्या आणि भटकंतीच्या,प्रवासाच्या अशा अनेक   
कितीतरी विडिओ मार्फत तुम्ही नेहमीच प्रत्येकाचं मन जिंकत आला आहात.तुमच्या प्रत्येक विडिओ मधून दिसणारा तुमचा 
बोलका स्वभाव पण तितकाच कुठेतरी अधूनमधून दिसणारा साधेपणा आणि कुठेतरी आपलेपणा भासवून देणारा स्वभाव असतो. 
साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हे वाक्य अगदी तुम्हालाच आणि तुमच्या सर्व बाकी सदस्यांना सुद्धा  समर्पित करू इच्छिते मी.
तुमच्या भटकंती आणि प्रवासाच्या विडिओ मार्फत सुद्धा खूप सुंदर आणि नवीन ठिकाणांची माहिती मिळते.महाराष्ट्रातील कित्येक 
माहिती नसलेल्या ठिकाणांपर्यंत तुम्ही आम्हा सर्वांना विडिओ मार्फत घेऊन जाता.तुमचा आणि अमोल सरांचा हा प्रवास असाच
कायम चालू राहूदेत अशी बाप्पाचरणी प्रार्थना.जेणेकरून आम्हा सर्व चाहत्यांना नवीन नवीन ठिकाणांची माहिती मिळत राहील. 
तुमच्याबद्दल अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते ती म्हणजे तुमची प्रत्येक विडिओ पाहताना आपलेपणा जाणवतो.तुम्ही आणि
अमोल सर प्रत्येक ठिकाणाची माहिती इतक्या चांगल्या रीतीने सांगता की,तुमचं खूप कौतुक आणि अभिमान वाटतो.तुमच्या ह्या 
कार्याला मनापासून नमस्कार.आणि अजून एक माझ्या आवडीची गोष्ट म्हणजे तुम्ही जे शेवटी वाक्य म्हणता ते ओके टाटा बाय.
हे तुमचं वाक्य कानावर पडताच पुढच्या विडिओची उत्सुकता अजूनच वाढते. 
                                       🙏मराठमोळ्या मुलीला आणि वाहिनीला माझा पुन्हा एकदा मनाचा मुजरा🙏
     ओके टाटा बाय 
 
 
 
 
 
 
 
🙏प्रथम तर तुमच्या ह्या किडेगिरीला सलाम.🙏
तुमची किडेगिरी तर खूपच उत्तम आहे बघा.प्रत्येकाच्या मनात आणि घराघरात पोहोचतेय ही तुमची किडेगिरी.मराठी किड्याच्या 
प्रत्येक सदस्याचे  मनापासून आभार की तुम्ही ही वाहिनी चालू केलीत.तुमच्या ज्या मुलाखतीच्या विडिओ असतात विविध विषयांवरील 
त्या खूपच उत्तम असतात.खूप चांगले आणि वेगळं काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न असतो तुमचा.एकाच विषयावर विभिन्न स्वभाव 
असणाऱ्या लोकांची तुम्ही मत जाणून घेता ती एक गोष्ट मला कौतुकास्पद वाटते.तुमचं ते विडिओच्या सुरुवातीला  राम राम मंडळी म्हणत स्वागत 
करणं ते सुद्धा खूप भारी वाटतं.पुणेरीपणा तर तुमच्या प्रत्येक विडिओ मध्ये दिसून येतोच.पुणेरी मिसळ सारखाच झणझणीतपणा,
तर तुमच्या प्रत्येक विडिओमध्ये दिसतोच.सूरजचा विनोदी स्वभाव तर खूप भारीच वाटतो प्रत्येक विडिओमध्ये.तुमच्या सर्व विडिओ 
उत्तम असतातच त्यात प्रश्नच नाही परंतु मला सर्वात आवडलेली विडिओ म्हणजे दिवाळी ह्या विषयावरची.अजून अशाच काही 
नवीन आणि वेगळ्या विषयांवरील विडिओ नक्कीच बघायला आवडतील.
               🙏पुन्हा एकदा मराठी किडा ह्या वाहिनीला मानाचा मुजरा.🙏
रामराममंडळी संस्कारराहिलेलेनाहीआहेत विषयखोल चक्कीतजाळ अंगातकिडापाहिजे
 
 
 
 
 
 
 
 





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझं अंगण....

मोडी लिपीची गोडी......

सुधागड किल्ला ... अविस्मरणीय आणि निसर्गरमणीय असा प्रवास