पोस्ट्स

जून, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बाबा

बाबा....आयुष्यातली खूप महत्वाची आणि ज्या व्यक्तीची तुलना कोणाशीच करू शकत नाही.जेव्हा आपला जन्म होतो तेव्हा आपले बाबा किती खूष होतात ना. आपण जेव्हा जन्म घेतो आणि बाबा आपल्याला त्यांच्या मिठीत घेतात तेव्हाचा तो त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आपल्याला बघायला मिळाला असता तर? खरंच देवाने अस काहीतरी करायला हवं होत.पण देवाला सुद्धा दोष देऊन चालणार नाही कारण त्याने बाकी काही आपल्याला देण्यापेक्षा इतके सुंदर बाबा आपल्याला दिलेच आहेत ना हे विसरून चालणार नाही. मला असा वाटतं की, आपला जन्म होताच देवाने बाबा म्हणजे आपल्याला दिलेले एक बक्षीसच आहे. अजूनही त्या बालपणीच्या आठवणी खूप काही देऊन जातात,चेहऱ्यावर एक स्मित हास्य आणि थोडं रडू सुद्धा येत. खरंच सगळं काही विसरून किती काळजी करतात ना आपली.आपण जेव्हा लहानपणी चालायला बघत असतो तेव्हा आपला कुठे तोल जाऊ नये,आपण पडू नये,म्हणून आपल्या पाठूनच फिरत असतात.चालताना त्यांचे ते बोट धरून चालणे खरंच खूप छान वाटायचे.जेव्हा आपण पहिल्यांदा बाबा बोलतो तेव्हा सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद या सगळ्याचे वर्णन जितके करावे तितके कमीच आहे.शाळेत जाताना त्यांचा तो हात ...
इमेज
वडापाव-चविष्ट आणि सगळ्यांनाच आनंद देणारा पदार्थ वडापाव हा शब्द कानावर जरी पडला तरी प्रत्येक जण किती खूष होतो ना.खरंच वडापाव आहेच तसा.खूप आधीपासूनच प्रत्येकालाच वडापाव आधार देत आला आहे असे मला वाटते.सकाळी जेव्हा चाकरमानी आपल्या कामासाठी निघतो तेव्हा हा वडापावच त्यांच्या पोटाला आधार देतो आणि मनाला एक प्रकारचा आनंद देतो.प्रत्येकालाच  वडापावचे वेड आहे अस मला वाटते.अगदी लहान मुलं,मोठी माणसं,वयस्कर माणसं सुद्धा वडापाव साठी वेडे आहेत.आपल्या आयुष्यात जशी काही माणसं आपल्याला नेहमी आधार देण्यास तयार असतात,अगदी तसच वडापाव सुद्धा प्रत्येकाला नेहमीच आनंद देण्यास ,आधार देण्यास तयार असतो.रोजच्या धावपळीच्या आयुष्यात हा वडापावच प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आणतो.वडापाव पावसाळ्यात तर सगळ्यांना आपला जिव्हाळ्याचा मित्रच वाटत असेल.पावसात छान भिजलेले असताना मस्त गरम गरम वडापाव खाण्यात एक वेगळाच आनंद आहे आणि त्याबरोबर चहा असेल तर दुग्ध शर्करा योगच.हा अनुभव प्रत्येकाने आयुष्यात नक्कीच घेतला असेल.वडापाव खर तर आपल्या प्रत्येकाला लाभलेली एक देणगीच आहे असे म्हंटलेे तरी चालेल.मी खू...

नोकरी आणि प्रवास

नोकरी.....आजकालच्या जगात प्रत्येकाच्याच आयुष्यातला एक अविभाज्य भाग, जगण्याचा एक मार्ग. माणूस नोकरी मध्ये आज काल इतका व्यस्त झाला आहे की त्याचे स्वतःकडे लक्ष आहे की नाही याचाच प्रश्न पडतो.पण तरीसुद्धा मला असे वाटते की माणूस नोकरी मध्ये व्यस्त जरी झाला असेल तरी तो समाधानी आहे.कारण तो इतका कामात व्यस्त असला तरी,नोकरी साठी रोज धावपळ जरी करत असला तरी त्याची ही धावपळ तो त्याच्या आयुष्यातल्या प्रिय व्यक्तींसाठी,त्यांच्या आनंदासाठी करत असतो.सकाळच्या ठोक्यावर त्याचा प्रवास चालू होतो. लोकल हा प्रत्येक नोकरी करणाऱ्या माणसाच्या आयुष्यातला महत्वाचा भाग आहे असे म्हंटले तरी चालेल.माणसाला त्याच्या ध्येयापर्यंत घेऊन जाण्याचे काम ही एकमेव लोकल करते.मी सुद्धा माणसांची ती लोकल मध्ये चढण्यासाठी ची धावपळ,लोकल मध्ये दुसऱ्या व्यक्ती ला हात देऊन केलेली मदत,सगळं काही अनुभवलंय.शेवटी प्रत्येकालाच आपल्या ठिकाणी वेळेवर पोहचायचे आहे, ही गोष्ट तो लोकल मध्ये प्रवास करणारा प्रत्येक व्यक्ती जाणतच असतो.तो जो लोकल मधला अर्ध्या-पाऊण तासाचा प्रवासच प्रत्येकाला थोडा वेळ का होईना पण एक वेगळाच आनंद देतो.कोणी एकमेकांशी गप्पा म...

तो पाऊस आणि त्या गोड आठवणी

⛆⛆पाऊस⛆⛆.....हा शब्द कानावर पडला की मनाला खरंच खूप आनंद मिळतो.पाऊस हा एक जिवलग मित्र आहे असे म्हंटले तरी चालेल.आपला जिवलग मित्र जस आपल बोलणं काहीही तक्रार न करता खूप वेळ ऐकून घेतो अगदी तसच हा पाऊस सुद्धा आपल्या मनातले सगळे काही ऐकून घेतोय असेच वाटते.माझ्या मते,पाऊस हा प्रत्येकालाच आनंद देणारा असतो.जेव्हा पाऊस पडतो तेव्हा पक्ष्यांचा आवाज कानावर पडला की असे वाटते की,ते सुद्धा आनंदाने गाणे गाउन आपला आनंद व्यक्त करतायत.हवेने डोलणारी झाडे-झुडपे पण बघितली की,असे वाटते की ती झाडे सुद्धा आनंदाने पावसाच्या त्या आवाजावर नृत्य सादर करतायत.पाऊस निसर्गाला सुद्धा त्याच्यात सामावून घेतो जसे की आई आपल्या बाळाला कुशीत सामावून घेते. पावसात भिजण्याचा सुद्धा एक वेगळाच आनंद असतो.पावसाचे ते थेंब हातावर झेलने,डोळे मिटून पावसाखाली उभे राहणे,त्यातच छान असा सुटणारा गार वारा,ढगांचा गडगडाट,चमकणारी वीज,मातीचा तो छान असा मनाला प्रसन्न करणारा सुगंध. खरंच पावसाबद्दल जितक बोलाव तितक कमीच आहे.पावसासोबतच्या बालपणीच्या आठवणी सुद्धा खूप आहेत.मनसोक्त पावसात भिजणं,साचलेल्या पाण्यात उड्या मारण,कागदाच्या बोटी कर...