वडापाव-चविष्ट आणि सगळ्यांनाच आनंद देणारा पदार्थ


वडापाव हा शब्द कानावर जरी पडला तरी प्रत्येक जण किती खूष होतो ना.खरंच वडापाव आहेच तसा.खूप आधीपासूनच प्रत्येकालाच वडापाव आधार देत आला आहे असे मला वाटते.सकाळी जेव्हा चाकरमानी आपल्या कामासाठी निघतो तेव्हा हा वडापावच त्यांच्या पोटाला आधार देतो आणि मनाला एक प्रकारचा आनंद देतो.प्रत्येकालाच  वडापावचे वेड आहे अस मला वाटते.अगदी लहान मुलं,मोठी माणसं,वयस्कर माणसं सुद्धा वडापाव साठी वेडे आहेत.आपल्या आयुष्यात जशी काही माणसं आपल्याला नेहमी आधार देण्यास तयार असतात,अगदी तसच वडापाव सुद्धा प्रत्येकाला नेहमीच आनंद देण्यास ,आधार देण्यास तयार असतो.रोजच्या धावपळीच्या आयुष्यात हा वडापावच प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आणतो.वडापाव पावसाळ्यात तर सगळ्यांना आपला जिव्हाळ्याचा मित्रच वाटत असेल.पावसात छान भिजलेले असताना मस्त गरम गरम वडापाव खाण्यात एक वेगळाच आनंद आहे आणि त्याबरोबर चहा असेल तर दुग्ध शर्करा योगच.हा अनुभव प्रत्येकाने आयुष्यात नक्कीच घेतला असेल.वडापाव खर तर आपल्या प्रत्येकाला लाभलेली एक देणगीच आहे असे म्हंटलेे तरी चालेल.मी खूप ठिकाणी लोकांना एकत्र वडापाव खाताना पाहिलंय,गप्पा मारत,तर कोणी मजा-मस्ती करत वडापाव ची मजा घेत असतं.वडापाव हा विभिन्न व्यक्तींना एकत्र आणण्याचे काम सुद्धा करतो.खरंच वडापावची 
 ही मजा आयुष्यात प्रत्येकाने अनुभवा.




         

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझं अंगण....

मोडी लिपीची गोडी......

सुधागड किल्ला ... अविस्मरणीय आणि निसर्गरमणीय असा प्रवास