तो पाऊस आणि त्या गोड आठवणी
⛆⛆पाऊस⛆⛆.....हा शब्द कानावर पडला की मनाला खरंच खूप आनंद मिळतो.पाऊस हा एक
जिवलग मित्र आहे असे म्हंटले तरी चालेल.आपला जिवलग मित्र जस आपल बोलणं काहीही तक्रार न करता खूप
वेळ ऐकून घेतो अगदी तसच हा पाऊस सुद्धा आपल्या मनातले सगळे काही ऐकून घेतोय
असेच वाटते.माझ्या मते,पाऊस हा प्रत्येकालाच आनंद देणारा असतो.जेव्हा पाऊस
पडतो तेव्हा पक्ष्यांचा आवाज कानावर पडला की असे वाटते की,ते सुद्धा
आनंदाने गाणे गाउन आपला आनंद व्यक्त करतायत.हवेने डोलणारी झाडे-झुडपे पण
बघितली की,असे वाटते की ती झाडे सुद्धा आनंदाने पावसाच्या त्या आवाजावर
नृत्य सादर करतायत.पाऊस निसर्गाला सुद्धा त्याच्यात सामावून घेतो जसे की आई
आपल्या बाळाला कुशीत सामावून घेते. पावसात भिजण्याचा सुद्धा एक वेगळाच
आनंद असतो.पावसाचे ते थेंब हातावर झेलने,डोळे मिटून पावसाखाली उभे
राहणे,त्यातच छान असा सुटणारा गार वारा,ढगांचा गडगडाट,चमकणारी वीज,मातीचा
तो छान असा मनाला प्रसन्न करणारा सुगंध. खरंच पावसाबद्दल जितक बोलाव
तितक कमीच आहे.पावसासोबतच्या बालपणीच्या आठवणी सुद्धा खूप आहेत.मनसोक्त
पावसात भिजणं,साचलेल्या पाण्यात उड्या मारण,कागदाच्या बोटी करून पाण्यात
सोडणं अशा खूप काही आठवणी कधीही न विसरता येणाऱ्या आहेत.प्रत्येकानेच
आपल्या बालपणात पावसाची मजा आवर्जून घेतलीच असेल.पावसात कांदा भजी आणि
चहाचा तर एक वेगळाच आनंद असतो.खरंच पावसाचा हा वेगळा असा आनंद,मनाला
प्रसन्न करणारे ते वातावरण,अगदी सगळं काही विसरून पावसात भिजण्याचा तो
अनुभव प्रत्येकानेच घेतला पाहिजे.पण पावसाचा हा आनंद आपल्याला कायम असाच
अनुभवायचा असेल तर प्रत्येकाने आपल्या ठिकाणी वृक्ष लागवड केली पाहिजे.पाऊस
ही देवाने आपल्या सर्वांना दिलेली खूप सुंदर देणगी आहे आणि ती जपणं हे
आपल्या सर्वांच एक कर्तव्य आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा