नोकरी आणि प्रवास
नोकरी.....आजकालच्या जगात प्रत्येकाच्याच आयुष्यातला एक अविभाज्य भाग, जगण्याचा एक मार्ग. माणूस नोकरी मध्ये आज काल इतका व्यस्त झाला आहे की त्याचे स्वतःकडे लक्ष आहे की नाही याचाच प्रश्न पडतो.पण तरीसुद्धा मला असे वाटते की माणूस नोकरी मध्ये व्यस्त जरी झाला असेल तरी तो समाधानी आहे.कारण तो इतका कामात व्यस्त असला तरी,नोकरी साठी रोज धावपळ जरी करत असला तरी त्याची ही धावपळ तो त्याच्या आयुष्यातल्या प्रिय व्यक्तींसाठी,त्यांच्या आनंदासाठी करत असतो.सकाळच्या ठोक्यावर त्याचा प्रवास चालू होतो. लोकल हा प्रत्येक नोकरी करणाऱ्या माणसाच्या आयुष्यातला महत्वाचा भाग आहे असे म्हंटले तरी चालेल.माणसाला त्याच्या ध्येयापर्यंत घेऊन जाण्याचे काम ही एकमेव लोकल करते.मी सुद्धा माणसांची ती लोकल मध्ये चढण्यासाठी ची धावपळ,लोकल मध्ये दुसऱ्या व्यक्ती ला हात देऊन केलेली मदत,सगळं काही अनुभवलंय.शेवटी प्रत्येकालाच आपल्या ठिकाणी वेळेवर पोहचायचे आहे, ही गोष्ट तो लोकल मध्ये प्रवास करणारा प्रत्येक व्यक्ती जाणतच असतो.तो जो लोकल मधला अर्ध्या-पाऊण तासाचा प्रवासच प्रत्येकाला थोडा वेळ का होईना पण एक वेगळाच आनंद देतो.कोणी एकमेकांशी गप्पा मारण्यात व्यस्त असतं,कोणी डोळे मिटून थोडावेळ विश्रांती घेतं ,तर कोणी एकत्र मिळून भ्रमणधवणी मध्ये खेळण्यात मग्न असतं,तर कोणी एकटच आपल्याच विचारात गुंग असतं ,कोणाची लोकल च्या प्रवासात आवडीची गोष्ट म्हणजे वर्तमानपत्र वाचणे,कोणी लोकल च्या बाहेर च्या प्रत्येक गोष्टीच निरीक्षण करण्यात व्यस्त असतं.खरंच लोकल मध्ये किती विभिन्न प्रकारची माणसं एकत्र प्रवास करत असतात. पण कोणी एकमेकांना परकं समजत नाही.खरंच रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात ही लोकलच प्रत्येकाला थोडावेळ विरंगुळा देते.लोकल चा प्रवास सुरु झाल्यांनतर थोडयावेळाने प्रत्येकजण आपापल्या दिशेने निघून जातो.मग नंतर रोजचे काम संपवून प्रत्येकजण परतीच्या प्रवासाला लागतो.सकाळी प्रवास करताना जो ताजा-तवाना चेहरा असतो तो कामाच्या व्यापाने थकलेला असतो.तरी सुद्धा काहीजण एकमेकांशी गप्पा मारून आपला थकवा दूर करण्याचा प्रत्यन करतात.काही वेळेच्या प्रवासानंतर माणूस जेव्हा घरी पोहोचतो,तेव्हा त्याच्या घरातल्या व्यक्तींच्या चेहऱ्यावरचे स्मित हास्य पाहूनच त्याचा थकवा नक्कीच कुठच्या कुठे पळून जात असेल.खरंच ह्या चाकरमान्यांचे कौतुक जितके करावे तितके कमीच आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा