बाप्पा......ओढ तुझ्या आगमनाची
सप्टेंबर महिना सुरु झाला की,सगळे फक्त एकाच ठिकाणी आपले लक्ष लावून असतात बाप्पा कधी येणार आपल्या भेटीला? कधी एकदा आपल्या घरी बाप्पा विराजमान होणार? सगळे अगदी आस लावून बसलेले असतात बाप्पा तुझ्यासाठी.बाप्पा तू सुद्धा नक्कीच आम्हाला सगळ्यांना भेटण्यासाठी उत्सुक असशील ना?खरं तर हा प्रश्न तुला विचारण चुकीच आहे कारण,तू तर नेहमी आमच्याबरोबर असतोच.प्रत्येक दुःखात-संकटात आमची साथ देतोस तू.जसा एक आपला जिवलग मित्र ,आपले आई बाबा कितीही कठीण प्रसंग आला तरी आपली नेहमीच साथ देतात,आपल्याला एकट सोडत नाहीत अगदी तू ही तसाच नेहमी बरोबर असतोस.पण बाप्पा मला कधी-कधी एक प्रश्न पडतो की,तू इतक्या लोकांचं दुःख दूर करतोस मग तुला दुःख नसेल का कोणत्या ही गोष्टीच,तुझी साथ कोण देत असेल?पण बाप्पा खरंच तुझे खूप मनापासून आभार.तुझे आभार जितके मानावे तितके कमीच आहेत.आज ह्या लेखनाच्या निमित्ताने मला अस वाटतंय की,बाप्पा तू माझ्यासमोरच बसला आहेस आणि मी तुझ्याशी गप्पा मारतेय.माझ्या प्रमाणे अनेक भक्तजन,तुझे चाहते तुझी खूप आतुरतेने वाट बघतायत.अगदी लहान मुले,तरुण मुलं,मोठी माणसं,वयस्कर माणसं सगळेच तुझ्या दर्शनासाठी उत्सुक आहेत.स...