पत्र आईसाठी....
आई,तू एक अशी व्यक्ती ह्या पृथ्वीतलावर आहेस जी नेहमी सर्वांचे मन राखत असते. स्वतःपेक्षा तू नेहमी दुसऱ्यांसाठी झटत असतेस. तुला नाही का वाटत आई, स्वतःसाठी वेळ काढावा. सर्वांच्या आवडी निवडी जपता जपता तू स्वतःची आवड काय हेच विसरून जातेस. किती व्यस्त होऊन जातं ना तुझ आयुष्य. मान्य आहे की, तुझा आनंद हा आमच्या आनंदात आहे. पण आई, स्वतःसाठी सुद्धा कधीतरी जगावं ग.
तुझा दिवस सुरू होतो तो आम्हाला नाश्ता साठी काय हवं? दुपारच्या जेवणासाठी काय हवं?रात्रीच्या जेवणासाठी काय हवं? कधी तू स्वतःला विचारतेस का की तुला काय हवय? तुझ शरीर जरी थकल तरी तुझी माया ही तितकीच सर्वांसाठी असते. तुझ्या कुशीत निजणं ह्या गोष्टीचा आनंद काही वेगळाच असतो. तू भरवलेला मायेचा घास सुद्धा माझी भूक भागवतो. पण हेच हात जेव्हा तुला घास भरवण्याची वेळ येते तेव्हा व्यस्त होतात त्याक्षणी मात्र खूप दुःख होत. तू मनात जागा देतेस तुझ्या लेकरांना, त्यांना जिवापाड जपतेस. पण हीच लेकरं मोठी झाल्यावर तुझी अडचण होऊ नये म्हणून जेव्हा वृद्धाश्रमात तुला सोडून जातात तेव्हा मात्र जीव तुटतो. तू केलेली इतक्या वर्षांची माया एका क्षणांत ते कसे काय विसरू शकतात? पाठी वळून तुझे पाणावलेले डोळे, त्यातील भाव पाहण्यासाठी ते लेकरू एकदा सुद्धा वळून पाहत नाही तेव्हा जीव तुटतो.
तुझ प्रेम आणि त्या प्रेमाची भाषा ही न्यारीच आहे. सर्व मातांना माझा मनापासून साष्टांग नमस्कार.
Khup chan
उत्तर द्याहटवाTysm.
हटवा