वीरगळ....वीर पुरुषांच्या स्मरणार्थ.
* वीरगळ अर्थ
वीरगळ म्हणजे वीर
पुरुषांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेला(दगडाचा अथवा लाकडाचा)स्तंभ असतो.
ह्यास वीरस्तंभ असेही म्हणतात. महाराष्ट्रात जुन्या देवळांच्या बाहेर वीरगळ
आढळतात.
* वीरगळ इतिहास
वीरगळ परंपरा ही कर्नाटकातून महाराष्ट्रात आली असे मानले जाते. कर्नाटक राज्यात मोठमोठे वीरगळ आढळून येतात, त्यातील काही वीरगळ हे शिलालेखांनी युक्त आहेत. महाराष्ट्रात शिलालेख कोरलेले वीरगळ तुलनेने कमी आहेत.
* वीरगळाचे स्वरूप
-वीरगळाचे सामान्यपणे तीन किंवा पाच भाग असतात.
-साधारणपणे अडीच किंवा तीन फूट दगडावर एकावर एक ह्या पद्धतीने तीन किंवा चार चौकोन खोदून घेतले जातात.
-सर्वांत खालच्या भागात वीर युद्धात लढत आहे, असे दाखवलेले असते. ह्यातून लढाईचे कारण सुद्धा स्पष्ट होते.
-सर्वांत
वरच्या भागात वीर योद्धा कैलास पर्वताला गेला आहे आणि शंकराच्या पिंडीची
पूजा करत आहे, असे दाखवलेले असते. युद्धात मरण आल्यास स्वर्गलोकप्राप्ती होते असे ह्यातून सुचवायचे असावे.
-काही वीरगळ हे चंद्र सूर्य ह्यांनी अंकित असतात. आकाशात चंद्र-सूर्य तळपत आहेत तोपर्यंत ह्या वीरांची स्मृती कायम राहिली असे ह्यातून सूचित करावयाचे असावे.
-काही वीरगळ हे सतीच्या हाताने अंकित असतात. एखाद्या बलिदान केलेल्या वीराची पत्नी त्यांच्यासह सती गेली असेल तर तिचे ते स्मारक मानले जाते. ह्या स्मारक शिळांवर कोणाचेही नाव नसते. फक्त चित्र कोरलेली असतात.
*वीरगळ प्रमुख प्रकार दोन
१. आयताकृती वीरगळ- आयताकृती वीरगळ ही फक्त समोरून किंवा तीन बाजूने कोरलेली असते.
२. स्तंभ वीरगळ- स्तंभ वीरगळ ही चारही बाजूने कोरलेली असते.
* वीरगळ

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा