वीरगळ प्रकार.....

 

मागील लेखात आपण "वीरगळ" ह्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेतली आणि वीरगळचे दोन प्रकार ह्याबद्दल सुद्धा माहिती जाणून घेतली. आजच्या लेखामार्फत आपण वीरगळीचे उर्वरित प्रकार, तसेच वीरगळ कोणत्या ठिकाणी आहेत ह्याबद्दल माहिती जाणून घेऊया.


* वीरगळीचे हे दोन प्रमुख प्रकार आहेत ज्याबद्दल आपण आधीच्या लेखात माहिती जाणून घेतली.

१. आयताकृती वीरगळ

     ही वीरगळ फक्त समोरून किंवा तीन बाजूने कोरलेली असते.

२. स्तंभ वीरगळ

    ही वीरगळ चारही बाजूने कोरलेली असते.


* आता आपण वीरगळीचे उर्वरित प्रकार आणि त्याबद्दल संदर्भात माहिती जाणून घेऊया.

१. वीरबळी वीरगळ 

२. गोवर्धन/गोधन वीरगळ 

३. पशु वीरगळ

४. द्वंद्व वीरगळ 

५. डोली वीरगळ 

६. गाववली वीरगळ 

७. अश्वदल/गजदल वीरगळ 

८. चौर्य वीरगळ 

९. साधू/संत वीरगळ 

१०. सूर वीरगळ 

११. ताबूत वीरगळ 


* माहिती:-

१. वीरबळी वीरगळ

     "वीरबळी वीरगळ" म्हणजे वीर राजा युद्धात जिंकावा म्हणून स्वतःच्या हाताने शिरच्छेद करून घेत त्याची शिळा.

२. गोवर्धन/गोधन वीरगळ 

     यादव काळात "गोधन" हेच श्रेष्ठ धन मानले जात असे.

३. पशु वीरगळ

    गावावर वाघ, रानगवे, इत्यादी पशूंचा हल्ला परतवताना वीराला जे मरण येते त्याला "पशु वीरगळ" असे म्हणतात.

४. द्वंद्व वीरगळ 

     दोन गावातील तुल्यबळ वीरांचे युद्ध/कुस्ती ह्यात जे वीरांना मरण येते त्यास "द्वंद्व वीरगळ" असे म्हणतात.

५. डोली वीरगळ 

     लग्न विधीत झालेले हल्ले किंवा विघ्न दूर करताना जे वीराला मरण येते त्यास "डोली वीरगळ" असे म्हणतात.

६. गाववली वीरगळ 

     परचक्र युद्धात एक वीर अनेकांशी लढताना जे वीरमरण येते त्यास "गाववली वीरगळ" असे म्हणतात.

७. अश्वदल/गजदल वीरगळ 

      वीरांना मोठ्या युद्धात आलेले वीरमरण त्यास "अश्वदल/गजदल वीरगळ म्हणतात.

८. चौर्य वीरगळ 

     चोरांचे हल्ले परतवताना वीरांना जे मरण येते त्यास "चौर्य वीरगळ" असे म्हणतात. चोरांकडे तलवारी तर समोरील लढणारे सामान्य असल्याने त्यांच्याकडे काठी असते. अशा प्रकारचे चित्र ह्या शिळेवर कोरेलेले दिसून येते.

९. साधू/संत वीरगळ 

    राक्षसांचे हल्ले परतवताना साधूंना जे वीरमरण येते त्यास "साधू/संत वीरगळ" असे म्हणतात.

१०. सूर वीरगळ  

      कलाकारांना जेव्हा वीरमरण येते त्यास "सूर वीरगळ" असे म्हणतात. ह्या वीरगळीवर अनेक वाद्य असतात.

११. ताबूत वीरगळ 

      विशेष स्मृती असलेल्या शिळांना "ताबूत वीरगळ" असे म्हणतात.


* महाराष्ट्र राज्यातील वैशिष्ट्यपूर्ण वीरगळ:-


* महाराष्ट्रात आंबेश्वर मंदिर, आंबा गाव मु.पो. कोंढावळे, तालुका मुळशी, जिल्हा पुणे ह्याठिकाणी वीरगळ आढळून येतात.

* जिल्हा रायगड, तालुका माणगाव येथील उंबरडी गावात शिवमंदिरात ४५ विविध वीरगळ आहेत.

* दिवेआगर जवळील "देगाव शिवमंदिरातील वीरगळीवर एकावर दहा डोकी असलेल्या आणि वीस हात असेलल्या व्यक्तीचे अंकन केलेले आहे.

* मुंबईतील बोरिवली उपनगराजवळ एक्सर गावात नौकायुद्ध चित्रीत केलेली वीरगळ आहे.

* महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील किकली हे वीरगळीचे प्रथम गाव आहे.

* नगर जिल्हा- श्रीगोंदा.

* रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील धूतपापेश्वर मंदिर परिसर.

* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाडा येथील विमलश्वर मंदिर परिसर.

* सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुका.

* महाराष्ट्राच्या सीमेवरील तेलंगणातील मदनूर ह्या गावी ३.५ फिट उंचीचे दोन सतीशीळ आढळतात.    


धन्यवाद!











टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझं अंगण....

मोडी लिपीची गोडी......

सुधागड किल्ला ... अविस्मरणीय आणि निसर्गरमणीय असा प्रवास