आयुष्य म्हणजे नक्की काय असत.....?

आयुष्य म्हणजे नक्की काय असत.....?
सुख-दुःखांचा लपाछपीचा खेळ,
आपल्या व्यक्तींसोबत घालवलेल्या गोड,अविस्मरणीय आठवणींचा खजिना,
एक असा प्रवास जो कधीही न संपणारा,
आयुष्य ह्या एका ठिकाणाचं तिकीट फक्त आपल्याला मिळालेलं असत,
त्या ठिकाणासाठीचा प्रवास कधी सुखांनी-दुःखांनी,तर कधी आठवणींनी भरलेला असतो,
तर कधी जबाबदारीची ओझी वाहण्यात सुद्धा हा प्रवास संपून जातो,
ह्या प्रवासात अशा बऱ्याच नावाची ठिकाण लागतात,
जी ह्या प्रवासात ठरलेलीच असतात,
ह्या प्रवासात काही अशी लोक सुद्धा भेटतात ज्यांच्यामुळे हा प्रवास अजूनच सुखाचा होतो,
शेवटी हा प्रवास  कसा होणार,कधी संपणार हे आपल्यावरच अवलंबून असत,
फक्त एवढचं आहे की,ह्या प्रवासात न थकता चालत राहायचं असतं,
तेव्हा कुठे हा प्रवास पूर्ण होतो.

आयुष्य हे असच असतं....... 
सुख आणि दुःख येतच असतात....... 
म्हणून खचून जायच नसतं....
धैर्याने आणि जिद्दीने पुढे जायचं असतं....... 
कारण पुढे गेल्यावरच प्रवास पूर्ण होतो आणि चेहऱ्यावर हसू उमलतं आणि समाधान मिळतं.
 
 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझं अंगण....

मोडी लिपीची गोडी......

सुधागड किल्ला ... अविस्मरणीय आणि निसर्गरमणीय असा प्रवास