बाबा

बाबा....आयुष्यातली खूप महत्वाची आणि ज्या व्यक्तीची तुलना कोणाशीच करू शकत नाही.जेव्हा आपला जन्म होतो तेव्हा आपले बाबा किती खूष होतात ना. आपण जेव्हा जन्म घेतो आणि बाबा आपल्याला त्यांच्या मिठीत घेतात तेव्हाचा तो त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आपल्याला बघायला मिळाला असता तर? खरंच देवाने अस काहीतरी करायला हवं होत.पण देवाला सुद्धा दोष देऊन चालणार नाही कारण त्याने बाकी काही आपल्याला देण्यापेक्षा इतके सुंदर बाबा आपल्याला दिलेच आहेत ना हे विसरून चालणार नाही. मला असा वाटतं की, आपला जन्म होताच देवाने बाबा म्हणजे आपल्याला दिलेले एक बक्षीसच आहे. अजूनही त्या बालपणीच्या आठवणी खूप काही देऊन जातात,चेहऱ्यावर एक स्मित हास्य आणि थोडं रडू सुद्धा येत. खरंच सगळं काही विसरून किती काळजी करतात ना आपली.आपण जेव्हा लहानपणी चालायला बघत असतो तेव्हा आपला कुठे तोल जाऊ नये,आपण पडू नये,म्हणून आपल्या पाठूनच फिरत असतात.चालताना त्यांचे ते बोट धरून चालणे खरंच खूप छान वाटायचे.जेव्हा आपण पहिल्यांदा बाबा बोलतो तेव्हा सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद या सगळ्याचे वर्णन जितके करावे तितके कमीच आहे.शाळेत जाताना त्यांचा तो हात धरून जाण्यात सुद्धा एक वेगळाच आनंद असतो.आपली प्रत्येक वेळी किती काळजी घेत असतात ना बाबा,शाळेत असताना सुद्धा आपली चिंता असते त्यांना,पुढे थोडे मोठे झाल्यावर आपल्या शिक्षणाची चिंता,शिक्षण पूर्ण झाल्यावर आपल्या नोकरीसाठी चिंता.बाबा स्वतःसाठी कधी वेळ काढत असतील की नाही याचा प्रश्न पडतो. आपण मोठे झाल्यावर त्यांची ती आपल्याबद्दलची काळजी,आपण सुखी राहावे म्हणून त्यांनी केलेली ती धडपड आपल्याला सुद्धा कळत असते. पण ते कधीही तक्रार न करता फक्त आपण सुखी राहावं यासाठी प्रयत्न करत असतात.बाबा आयुष्यात एवढ्या जबाबदाऱ्या पार पाडत असतात,तर ते थकत नसतील का?त्यांना सुद्धा आराम करावा अस वाटत नसेल का?खरंच बाबा आयुष्यात ज्यांना असतात ते खरंच नशीबवान असतात.ह्या जगात जेवढे बाबा आहेत ना त्या सगळ्या बाबांना खरंच मनापासून धन्यवाद....!🙏🙏

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझं अंगण....

मोडी लिपीची गोडी......

सुधागड किल्ला ... अविस्मरणीय आणि निसर्गरमणीय असा प्रवास