आईची माया....
आईची माया....
आईची माया कधीच कोणासाठी संपत नसते.
आपल्या आवडीनिवडी जपत तिच्या दिवसाची सुरुवात होते.
दिवसभर मेहनत करत राहणारी ती कधीच थकत नसते.
घरी पाहुणे येताच त्यांचे आदरातिथ्य करण्यात ती स्वतःला गुंतवून घेते.
ह्या सर्व जबाबदारीत ती स्वतःला मात्र विसरते.
तिने केलेल्या स्वयंपाकाने प्रत्येकाचे तृप्त, आनंदी, समाधानी चेहरे पाहून ती स्वतःचा थकवा विसरते.
त्या जेवणात तिची माया उतरलेली असते.
परंतु, जेव्हा शरीर थकते तेव्हा तिला तिचेच घर परके वाटू लागते.
तिने ज्या घराला जिव्हाळा लावला, इतकी वर्ष ज्या घरात आनंदाने संसार केला, त्याच घरातून तिची सोय एका वृद्धाश्रमात केली जाते.
त्याक्षणी मात्र ती पूर्णतः खचून जाते आणि डोळ्यात आलेले अश्रू लपवण्याचा प्रयत्न करते.
Khupch chan aaichi thorvi vachta vachta dolyat pani aal nashibvan aahet jyanchakade aai aahe
उत्तर द्याहटवाDhnyawad Aapan Dilelya Pratikriyebaddal.Ekdam barobar bollat tumhi.
हटवा